- The Helicopter Dhoni … Takes a Pause! - August 16, 2020
- A Pavitra Rishta had a long way to go ! RIP Sushant Singh Rajput ! - June 15, 2020
- Mahabharata: Then and Now… - May 14, 2020
Maharashtra Government formation was all about twists and turns. I have written a Marathi Poem based on recent daily events , which I conclude today as the new CM has taken oath. The poem is written in 3 parts.
***********************************************
वाघाचं स्वप्न ! राजाची कमाल ! लग्नाचा करार ! आणि कमळाबाईची माघार !
***********************************************
* भाग -१
निवडणुक : कमळाबाईचा काडीमोड आणि वाघाची तडजोड ….
वाघाचं लग्न ठरलं! गंगेत घोडं न्हालं !
गावं म्हटलं कमळाबाई ! वाघ म्हटला जमत नाही!
कमळाबाई रुसली ! वाघाला सोडुन गेली !
वाघ पडला एकटा ! झाला एकदम पोरकां !
कमळाबाई काही ऐकेना ! म्हणे आता माझं पण पटेनां !
वाघ झाला सैरभैर ! आता नव्हती कुणाची खैर !
शोधु लागला वधू ! पण होता स्वत:च अधु !
वाघाची नजर भिरभिर ! झाली रोजचीच किरकिर !
नजर काही जुळेना ! वाघाचं कुठे जमेना !
आला तिकडून जंगलाचा राजा ! वाघ म्हटला विवाह कर माझा !
राजा होता मोठा चतुर ! शोधु लागला कुणी फितुर !
राजालां दिसली एक झोपडी ! परिस्थिती मात्र फारच तोकडी !
झोपडीत होती एक वधु ! वाघासारखी तीपण अधु !
राजा म्हटला वाघाला ! होतो मी मुलीचा मामा !
लग्न लावतो थाटात ! मलापण घे घरात !
वाघ म्हटला नकोती वणवण ! लग्नासाठी काहीपण !
अखेर ठरलं, वाघाचं ठरलं ! गुडघ्याला बाशिंग बांधल !
वाघाचं लग्न ठरलं ! गंगेत घोडं न्हालं !
********************************************
* भाग-२
अचानक झालेलं कमळाबाईचं लग्न …
राजाचा शिलेदार अजित हुशार !
म्हटला मीच तुझा वारसदार !
नको तो वाघ अनं ती संधीसाधु वधु
अशा घरात मी का नांदु !
कमळाबाई कडे गावाचे लक्ष
वाघ आहेच मुळी खुप रुक्ष !
मलापण राखायचा संसाराचा गड
कमळाबाई सोबत आता माझाचं फड !
वाघाच्या स्वप्नात असंख्य विघ्न
अखेर कमळाबाईचेच लग्न !
********************************************
* भाग-३
राजाची कमाल आणि लग्नातला करार….
कमळाबाईचं लग्न औटघटकेचं !
अप्रुप फक्त काही दिवसांच !
राजाचा शिलेदार म्हटला नको तुझा व्यवहार !
माझा राजा देतोय मला पुन्हा हुंकार !
कमळाबाई बावरली , थोडी वैतागली !
कंटाळून अखेर गावी परतली !
वाघ होताच तयार लग्नमंडपात !
वधु पण होती हातात घेऊन हाथ !
राजा म्हटला होऊ द्या करार ! आणि उडवा लग्नाचा बार !
कमळाबाईनं घेतली तुर्त माघार !
अखेर लागलं , लग्न लागलं ! वाघाचं लग्न लागलं !
कमळाबाईचं मन मोडलं !
कमळाबाई म्हटली गावांला ! असचं तुमच्यावर प्रेम करीन !
मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !
-जयवंत
image courtsey: India Today
टिप : वरील ओळीं सद्य राजकीय परिस्थतीवर विडंबन आहे , संबोधन नाही